मोरया अंकाचे प्रकाशन करताना आ. रोहित पवार , उद्योजक पुनीत बालन, गणेश देशपांडे (गिल्लू ) व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे दि ६ ) :-
सार्वजनिक गणेशोत्सवाची आपली गौरवशाली परंपरा जागतिक पातळीवर आकर्षणाचा विषय ठरत आहे. या परंपरेतील महत्त्वाचा भाग आहे ती वादन संस्कृती. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी वंदे मातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक गेली १४ वर्षे अव्याहतपणे काम करत आहे. युवा वाद्य पथकाच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व युवक गणेशोत्सव काळातील वादनासोबतच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहोत. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारा भारतातील पहिला गणेशोत्सव अंक ‘मोरया’ या नावाने आम्ही सुरू केला. २०२३ साली या अंकाचा शुभारंभ झाला आणि महाराष्ट्रातील वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद लाभला. मोरया २४ गणेशोत्सव अंकाचे द्वितीय पुष्प दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आले. या अंकामध्ये आराध्य दैवत श्री गणेश, सार्वजनिक गणेशोत्सव, इतिहास अशा विविध विषयांवरील लेख, फोटो, फोटो स्टोरीज यांचा समावेश आहे. मोरया २४ गणेशोत्सव अंकाच्या अतिथी संपादक मा. जान्हवी धारीवाल आहेत. संपादक गणेश देशपांडे आहेत. या अंकाचे प्रकाशन मा. पुनितदादा बालन आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवात अमूल्य योगदान दिलेल्या मान्यवरांना ‘युवा मोरया सन्मान पुरस्कार २०२४’ ने गौरवण्यात आले. यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन पंडीत, युवा वाद्य पथकाचे विश्वस्त ओंकार गाढवे, ॲड. अनिश पाडेकर, ॲड. मनिष पाडेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तरी हा उपक्रम अधिकाधिक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.