फलटण टूडे वृत्तसेवा(बारामती: प्रतिनिधी ) :-
गणपती बाप्पा मोरया ,मंगलमूर्ती मोरया म्हणत व ढोल ताशा वाचवत, फुलांची ,गुलालाची उधळण,फुलांची आरास करीत व गणेश मंडळे त्याचप्रमाणे दारासमोर रांगोळी काढून गणरायाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात बारामती एमआयडीसी परिसरामध्ये शनिवार दि.०७ सप्टेंबर रोजी करण्यात आले.सिटी इन् ,पेन्सिल व संदीपा कॉर्नर ,कल्याणी कॉर्नर व कटफळ चौक आदी परिसरात गणेश मूर्ती विक्री दुकाने, आरास साहित्याची दुकाने, फळे व पूजेचे साहित्य दुकाने च्या रांगा व खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती, बालगणेश शिवा अवतार ,स्वामी समर्थांच्या रूपातील गणेश मूर्ती, लालबाग चा राजा गणेश मूर्ती यांना मोठी मागणी होती.गणेश स्थापना सकाळी ११ ते २ पर्यंत पंचांग प्रमाणे असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध छोट्या-मोठ्या मंडळाचे गणपती खरेदी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ट्रक ट्रॅक्टर चा वापर केला होता.विद्या प्रतिष्ठान समोरील बाजूस गर्दीचा महापूर झाला होता भिगवन रस्त्यावर वाहने लागत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता वाहने व्यवस्थित लावत गणेश भक्त खरेदीचा आनंद लुटत होते.फोटो ओळ: बारामती मध्ये घरगुती गणेशाचे पूजन करताना गणेश भक्त