अंशुमन शैलेंद्र नागमल याचा सन्मान करताना मान्यवर —————–
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी ) : –
शारदानगर येथे झालेल्या क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल कटफळ च्या -१७ वर्ष वयोगटामध्ये अंशुमन शैलेंद्र नागमल या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने ५० मीटर फ्रीस्टाइल व १०० मीटर फ्रीस्टाइल तसेच बेस्ट स्ट्रोक ५० मीटर या तिन्ही प्रकारांमध्ये रौप्य पदक मिळवले तसेच समर्थ गावडे याने-१४ वयोगटात फ्री स्टाइल ४०० मिटर मध्ये रौप्य पदक मिळवले. दोन्हीही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल शाळेचे अध्यक्ष संग्राम सिंह मोकाशी सचिव संगीता मोकाशी व शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.