मान्यवरांच्या हस्ते बक्षिस घेताना विजेते खेळाडू
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
बारामती येथे ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन च्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धा ८ सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या.या स्पर्धेत बारामती संघाने प्रथम क्रमांक पटकवला.या प्रसंगी ऑल पुणे ग्रामीण चे अद्यक्ष अक्षय थोरात, खजिनदार अनंत भोसले, अनिल दुबळे, अक्षय जगताप, साहेबराव ओहोळ आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण संपन्न झाले.पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर,हवेली, बारामती तालुक्यातील २४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा रेग्यु, तुंगल, गंडा, फाईट इत्यादी इव्हेंट मध्ये पार पढली. या स्पर्धेत महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशन चे डायरेक्टर श्री. अरविंद शिर्के यांनी स्पर्धा डायरेक्टर म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बारामती संघाने मिळवाला तसेच दुतीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान अनंतरावं पवार इंग्लिश मेडीयम स्कुल भिगवण संघा ने मिळवला व तृतीय क्रमांक दौंड तालुक्याने मिळवला.अशी माहिती ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट चे सचिव व आयोजक साहेबराव ओहोळ यांनी दिली. पिंच्याक सिलेट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून (१) इंडिंग (फाईड) (२) तुगल (सिंगल काता)(३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट), (५) सीलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० हा या सखेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखिव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला “युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविदयालय संच”, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कांउसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, पुथ गेम व ऐशियन थिय गेम, भारतीय विश्वविदयालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता.जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळलेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशन आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया यांनी दिलेल्या गाईडलाईनने पार पडली आहे अशी माहिती साहेबरावं ओहोळ यांनी दिली.फोटो ओ