संदीप फर्निचर च्या होम मिनिस्टर प्रसंगी विजेत्या महिला व पी. डी. पवार व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती ): –
गणेशोत्सव निमित्त महिला ग्राहकांसाठी खास होम मिनिस्टर खेळ रंगला फर्निचर चा या कार्यक्रमात सौ अंकिता प्रदीप कूतवळ विजेत्या ठरल्या. रविवार ८ सप्टेंबर रोजी भिगवण रस्त्यावरील संदीप फर्निचर मध्ये गोदरेज इंटरिओ या दालनाचा उदघाटन समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रम चा शुभारंभ खासदार सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी बारामती इंडस्ट्रियल डेवलोपमेन्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे चेअरमन शरद सूर्यवंशी,माळेगाव कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण,जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे , बारामती बँक संचालक नामदेव तुपे, मा. जिल्हा परिषद सदस्या संध्या देवी पवार,पंजाब नॅशनल बॅक व्यवस्थापक निलेश खाडे, गोदरेज कंपनीचे मार्केटिंग हेड सौरभ ,व पिंपरी चिंचवड चे मा नगरसेवक बाळासाहेब जाधव,रविराज तावरे,दत्तात्रय पवार आदी मान्यवर उपस्तीत होते.उदघाटन निमित्त ग्राहक महिलांसाठी खेळ रंगला फर्निचर चा कार्यक्रम अनिल सावळेपाटील यांनी सादर केला या मध्ये प्रथम क्रमांक अंकिता कुतवळ, द्वितीय क्रमांक लता वावगे, तृतीय क्रमांक वर्षा हदगल यांनी पटकाविला विजेत्या महिलांना फर्निचर क्षेत्रातील विविध वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.मोठ्या शहरातील प्रत्येक वस्तू बारामती मध्ये वेळेत ग्राहकांना उपलब्ध व्याहवी त्याचबरोबर गुणवत्ता व दर्जात्मक वस्तू देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रास्ताविक मध्ये पी. डी. पवार यांनी सांगितले. आभार संदीप पवार यांनी मानले.