फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण)-
भारत देशाचे माजी राष्ट्रपती,भारत रत्न डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन याचां जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगुन शिक्षकांचे भावी पिढी घडवण्यात फार मोठे योगदान आहे असे प्रतिपादन श्री महेंद्र भैय्या सूर्यवंशी (बेडके) यांनी केले केले.
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त JSG संगीनी फोरम ,फलटण मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून महेंद्र भैय्या (सूर्यवंशी )बेडके बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता साहेब,श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर चे विश्वस्त व फलटणमधील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्रभई कोठारी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, तसेच संगिनी फोरम अध्यक्षां सौ. अपर्णा जैन, उपाध्यक्षां सौ. मनीषा व्होरा ,सचिव सौ.प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ.मनीषा घडिया, सहसचिव निता दोशी, माजी सचिव दीप्ती राजवैद्य, पोर्णिमा शहा, संगिनी सदस्या सारिका दोशी, जयश्री उपाध्ये,संध्या महाजन , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना बेडके व शिक्षिका व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संगिनीअध्यक्षां सौ.अपर्णा जैन यांनी शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा देऊन, आपल्या जीवनात शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे असे सांगुन संगिनी फोरमच्या विविध उपक्रमा बद्दल आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बेडके , उपशिक्षीका सौ.जया देसाई,सौ. ज्योती खरात, उपशिक्षक नागेश्वर सोनवलकर,सोनाई बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका साधना सतिश महामुनी,उपशिक्षीका आश्विनी चौधरी यांचा तसेच संगिनी सहसचिव निता दोशी याचां सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी केले. आभार प्रदर्शन मनीषा घडिया यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भैय्या सूर्यवंशी (बेडके)व व प्रमुख पाहुणे यांचा संगिनी फोरम मार्फत शाल श्रीफळ व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रशालेतर्फे मान्यवरांचा तसेच संगिनी पदाधिकारी यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.