राज्यस्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धा मुंबई उपनगर संघाची निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ) : –

येत्या १३ ते १५ सप्टेंबर रोजी आडगाव, नाशिक येथे एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन- महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात बोरीवली (पश्चिम) येथील सुविद्या प्रसारक संघ आणि बीमा नगर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या ८ खेळाडूंची निवड झाली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये प्रमुख प्रशिक्षिका व राष्ट्रीय पंच सौ. संचिता देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू सराव करतात. सहाय्यक प्रशिक्षक आशिष देवल हे देखील कार्यरत आहेत. हे दोघेही “मल्लखांब लव” या संघाच्या माध्यमातून मल्लखांब, एरियल स्पोर्ट्स, जिमनॅस्टिक, योगा व भारतीय व्यायामाचे नियमित प्रशिक्षण वर्ग चालवतात.गेल्या राज्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेत यंदा देखील मुंबई उपनगरचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री आहे. या राज्य स्पर्धेतून झाशी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. *निवड झालेले खेळाडूं*मुली :-नॅशनल डेव्हलपिंग ग्रुप ( ८ ते ११ वर्ष मुली )१) जिआना रजक २) शिवाई पोवार मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुली )१) सान्वी सावंत२) आर्या जाधवज्युनियर ग्रुप ( मुली )१) अमोलिका श्रोत्रीमुलांमध्ये :-मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुले )१) शौर्य नाईकसब ज्युनियर ग्रुप (१५ ते १७ वर्ष मुले )१) निरंजन अमृतेज्युनियर ग्रुप (१८ ते २० वर्ष मुले )१) द्वारकाधीश पाटील

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!