गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत मनोज तुपे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
रियल डेअरीचे रोपटया पासून ते वटवृक्ष करण्यात प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बहुमोल योगदान आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे यांनी केले.बारामती एमआयडीसी येथील रियल डेअरी मध्ये गणेशोत्सवानिमित्त सलग १० वर्ष सेवा केलेल्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या वेळी मनोज तुपे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर व महादेव गायकवाड, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, संग्राम मोकाशी, सोमनाथ गायकवाड,अमर घाडगे, नानासाहेब थोरात, शरद तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेच्या युगात जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर रिअल डेअरी चा प्लान्ट यशस्वीपणे चालीवला आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली समर्थ साथ यामुळे अनेक नामवंत कंपन्यांचे पुरस्कार व शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत या पुढेही कुटूंब म्हणून जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही मनोज तुपे यांनी दिली.सामान्य शेतकरी चा मुलगा, कामगार आणि यशस्वी उद्योजक हा प्रवास संघर्षमय असून त्यात यश मिळवणे व मिळवलेले यश टिकवणे ही लीलया कामगिरी तुपे परिवाराने केलेली साध्य केली या मध्ये अनिता ताई तुपे यांनी दिलेली खंभीर साथ म्हणून यशस्वी उद्योजक मनोज तुपे यांच्या यशस्वी होण्यात अनिता ताई यांचा वाटा असल्याचे मनोगत मध्ये विविध मान्यवरांनी सांगितले.प्रितम पारखे, सुशांत शिर्के, उमेश काटे , सुभाष चोपडे, प्रवीण तावरे, प्रमोद गिरीगोसावी, संतोष सुपेकर, सोमनाथ वाबळे , रवींद्र ढेकाणे, पुरुषोत्तम झगडे, संदीप खोमणे , चंद्रकांत सुर्वे, गणपत भोसले, नितीन डोईफोडे, सुरेश कांबळे, अशोक सोंडगे आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले.गरज असताना कंपनीने दिलेली नोकरी व अडचणीच्या वेळेस दिलेली मदत या मुळे कंपनी म्हणजे आपले कुटूंब असल्याचे गुणवंत कर्मचारी यांनी सांगितले.सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले आभार व्यवस्थापकीय संचालिका अनिताताई तुपे यांनी मानले.——————