ॲप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी मान्यवर व प्रशिक्षणार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे ८ दिवसीय अॅप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यक्रम संपन्नमहाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट (टी अँड पी) सेलने चतुर्थ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या सर्व विद्याशाखांसाठी हि अॅप्टिट्यूड प्रशिक्षण कार्यशाळा २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित केली होती . हे प्रशिक्षण कोल्हापूरमधील अॅप्टेक इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आले, जे अॅप्टिट्यूड आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यशाळेत संगणक, आर्टीफिसेल इंटीलिजन्स आणि डेटा सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी या सात शाखेच्या एकुण ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी मुवाझ पटेल, संकेत लुटे, नवनीत दत्ता, मोहन शिंदे, शोएब अत्तार आणि श्रीनिवास यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड कौशल्यांमध्ये वाढ करून त्यांना कॅम्पस भरती मोहिमा आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे हा होता. प्रशिक्षणात गुणात्मक अॅप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, वर्बल अॅबिलिटी, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि कंपनी-विशिष्ट चाचणी पॅटर्न यांसारख्या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपली समस्या सोडवण्याची क्षमता आणि एकूणच आत्मविश्वासात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्याचे नमूद केले. विद्यार्थी आता कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळी होणाऱ्या अॅप्टिट्यूड चाचण्या तसेच इतर स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारीत आहेत. टी अँड पी सेल भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत राहील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कौशल्यात सातत्याने वाढ होईल.हे प्रशिक्षण आयोजित करण्याकरिता संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांनी मदत केली. या प्रशिक्षणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुरज कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यातील सर्व विभाग समन्वयक, तसेच चारुदत्त दाते, व प्रवीण नगरे यांनी या प्रशिक्षणासाठी सहकार्य केले. शेवटी हे प्रशिक्षण अत्यंत यशस्वीपणे पार पडले.