ज्वेलरी मेकिंग मधून स्वयंरोजगार- सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिग्री शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्य आधारित कोर्सेस घेतल्यास स्वयंरोजगारास चालना मिळेल असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या सौ वसुंधरा नाईक निंबाळकर यांनी प्रतिपादन केले

त्या मुधोजी महाविद्यालयाच्या कौशल्य विकास केंद्रांतर्गत चालविल्या जाणाऱ्या ज्वेलरी मेकिंग कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी समन्वयक डॉ. योगिता मठपती यांनी प्रास्ताविक केल्यानंतर उद्घाटक म्हणून बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयात अनेक उपक्रम चालवले जातात त्यामध्ये अशा प्रकारचे कौशल्यावर आधारित व अनुभवा आधारित कोर्सेस विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरतील. व त्यातून विद्यार्थिनींना स्वयंरोजगार प्राप्त होईल. त्यामुळे असे रोजगारक्षम कोर्सेस कॉलेजमध्ये घेतले आहेत याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

या कोर्सच्या ट्रेनर काशीद मॅडम यांनी कौशल्यासाठी ट्रेनिंग चे महत्व उपस्थितांना सांगितले. विशेषतः स्त्रियांना व मुलींना विशेष कार्यक्रमाप्रसंगी अशा ज्वेलरी युक्त दाग दागिन्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे या व्यवसायाला खूप स्कोप असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सौ. नूतन शिंदे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षणावर अधिक भर असून त्या अनुषंगाने असे विविध कोर्सेस महाविद्यालयांमध्ये राबविले जाणार आहेत जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही ना काही कौशल्य प्राप्त होईल व त्या माध्यमातून त्यांना नोकरी ऐवजी स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळेल व त्यांची बेरोजगारीतून मुक्तता होईल व युवक युवतींच्या मध्ये कौशल्याच्या आधारित आत्मविश्वास निर्माण होऊन स्वयंरोजगारासाठी त्यांची मानसिकता तयार होईल.

प्रारंभी कार्यक्रमाच्या उद्घाटक व विशेष उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे प्राचार्यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. तर समारोपानंतर प्राध्यापिका सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्यास दैनिक ऐक्याचे पत्रकार कदम सर, मानव्यविद्या शाखेचे इन्चार्ज डॉ. ए .एन शिंदे, ऋतिका काळेल (ट्रेनर)व प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!