फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. १४) : –
मुधोजी महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाची माजी राष्ट्रीय खो – खो खेळाडू व खो – खो खेळातील सर्व पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कु. प्रियांका येळे हिचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या नियुक्ती आदेशानुसार राज्य शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व सेवक यांनी हार्दिक अभिनंदन केले.