गणेशोत्सव मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना सरपंच जगन्नाथ वणवे व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी आदर्श मित्र मंडळ खाडेनगर,तर्फे गणेशोत्सवा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधर वस्ती नं.२, वंजारवाडी येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे व खाऊ वाटप करण्यात आले.या प्रसंगी वंजारवाडी चे लोकनियुक्त सरपंच जगन्नाथ (काका) वणवे, व मयुरेश्वर डेव्हलपर्स चे संचालक चंद्रकांत चौधर व अशोक चौधर, उद्योजक अजिनाथ खाडे रोहित खाडे, सुशांत खाडे मंडळाचे अध्यक्ष, वैभव खाडे, सहकारी संतोष सोनवणे, संतोष खाडे,पै. प्रतीक खाडे. निखिल खाडे, शाळेचे मुख्याध्यापक पिलाजी गुरूजी यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना शाबासकी देण्यासाठी गणेश उत्सवामध्ये असे कार्यक्रम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच जगन्नाथ वनवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ खाडे यांनी केले, मुख्याध्यापक पिलाजी गुरूजी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .