विजेत्यांचा सन्मान करताना श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती शहरातील सर्वात जुने व जास्त ७५ वर्ष पूर्ण झाले असे श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये विजेत्या ठरल्या सौ. सुजाता चेतन घुमरे कार्यक्रमाचा शुभारंभ शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष सुभाष जांभळकर, उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, दत्तात्रय सोनवले, खजिनदार लालासो नलवडे, सहखजिनदार संतोष वाडेकर ,सचिव नंदकुमार मुश्रीफ, सहसचिव रमाकांत दामोदरे, कार्याध्यक्ष संतोष पाटणे, सहकार्याध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, भूषण देवळे व राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सागर खलाटे आदी मान्यवर उपस्तीत होते .मंडळास ७५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना वाव भेटावा या साठी श्री सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रथम क्रमांक.सौ सुजाता घुमरे द्वितीय क्रमांक.सौ तृप्ती मयूर चव्हाण तृतीय क्रमांक सौ भूमी दवेयांनी पटकावला. मुलगी वाचवा मुलगी शिकवा पर्यावरण वाचवा पाणी वाचवा आधी सामाजिक विषयावर महिलांनी विविध उखाणे सादर केले .आभार पंकज जांभळकर यांनी मानले.फोटो ओ विजेत्यांचा सन्मान करताना श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी