कटफळ मधील फार्मासी कॉलेज —————-
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
कटफळ (ता. बारामती) येथील सद्गुरू श्री. वामनराव पे शिक्षण संस्था संचलित नव्याने स्थापन झालेल्या चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ला शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या फार्मसी कॉलेजला डिप्लोमा (डी.फार्म) आणि बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म) अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली या मान्यता प्राधिकरणा कडून मान्यता मिळाली आहे. पी. सी. आय. बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BATU), लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) आणि तंत्र शिक्षण संचानालय, महाराष्ट्र शासन च्या तज्ञांच्या टीमने महाविद्यालयाच्या पायाभूत सोयी – सुविधा, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्राध्यापक आणि अभ्यासक्रमाची सखोल तपासणी केल्यानंतर मान्यता दिली. डी.फॉर्म आणि बी. फॉर्म अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाल्याने बारामती आणि परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी, कटफळ, बारामती मध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि अध्यापन आणि संशोधनाची आवड असलेले प्राध्यापक सह उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि त्यांना फार्मसी क्षेत्रातील यशस्वी करिअरसाठी तयार करणे हे आमचे ध्येय आहे, बाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि परिसरातील विद्यार्थ्याना वाहतूक सुविधा उपलब्ध आहे’ असे संस्थेचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोकाशी यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान भरावयाचा महाविद्यालयाचा चॉईस कोड (DTE Code) 16336 हा आहे.
