अजयशेठ फराटे यांचे कार्य आदर्शवत व आसू गावच्या वैभवात भर टाकणारे : श्रीमंत संजीवराजे

अजयशेठ फराटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विविध मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (आसू दि.२० ):-

आसू गावचे युवा नेते , युवा उद्योजक म्हणून परिचित असलेले व अजय नागरी पतसंस्थेच्या व दीपगंगा सोसायटीच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक गरजा पुर्ण करत. फलटण,बारामती ,इंदापूर , माळशिरस तालुक्यामध्ये डायनामिक्स कूलर प्लांट चे जाळे निर्माण केलेल्या श्री अजयशेठ राजन फराटे यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त आसू येथील एसटी स्टँड परिसरात आय लव्ह आसू नावाचा डिजीटल फलकाचे अनावरण तसेच विविध चौकामध्ये व मंदिरांपुढे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (राजे गट ) यांच्या मार्गदर्शनातून हायमस्ट लाईटचे पोल उभारण्यात आले. मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी या शुभदिनी वाढदिवसाचे औचित्य साधून वरील विकास कामांचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

यावेळी बोलतांना मा.श्रीमंत संजीवराजे म्हणाले की युवा उद्योजक श्री अजयशेठ फराटे यांचे काम प्रेरणादायी असून ते आदर्शवत आहे . त्यांच्या सामाजिक कार्याने आसू च्या वैभवात भर पडलेली असून त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेस नक्कीच होईल.त्यांचे हे कार्य युवक वर्गास आदर्शवत व दिशादर्शक असे आहे. अशा सर्व विकास कामांसाठी आमच्याकडून सदैव सहकार्य केले जाईल असे श्रीमंत संजीवराजे यांनी त्यांच्या वाढदिवस सत्कार प्रसंगी गौरवउद्गार काढले .

या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट ) राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार ,फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री दीपक चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , आथनी शुगरचे चेअरमन श्री श्रीनिवास पाटील , जीएसटी कमिशनर डॉ.धनंजय कदम , उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार यांचे खाजगी स्वीय सहाय्यक श्री हनुमंत पाटील ,हवेली तालुका प्रांताधिकारी श्री यशवंत माने , नवी मुंबई चे एस पी श्री मयूर भुजबळ , अकलूज चे डी वाय एस पी श्री नारायण शिरगावकर , बारामती डी वाय एस पी श्री सुदर्शन राठोड , इत्यादींनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या .

यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री विश्वास गावडे ,बारामतीचे युवा उद्योजक रणजीत तावरे , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री संजय परकाळे व श्री स्वामीनाथ साबळे ,उद्योजक सतीश ननावरे , उद्योजक श्री प्रमोद झांबरे ,श्री संग्राम फराटे , श्री जय पवार युवा उद्योजक श्री तुषार भैय्या नाईक निंबाळकर ,प्रगतशील बागायतदार श्री ज्ञानदेव गोफणे व श्री राजेंद्र गोफणे , फलटण टुडे चे संपादक श्री अमोल नाळे , उद्योजक श्री नितीन शिंदे , श्री आबा साबळे ,प्रगतशील बागायतदार श्री हनुमंत खरतोडे ,श्री केतन पवार , रोहित भोई , श्री रियाज महात , श्री मोहसिन काझी ,सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल पवार ,सागर गोफणे ,अजित निकम , अरविंद राऊत तसेच आसू पंचक्रोशीतील विविध मान्यवर तसेच ग्रामस्थ व फलटण , बारामती , इंदापूर तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अजयशेठ फराटे यांना शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेंद्र फाळके यांनी तर आभार श्री निलेश गोफणे यांनी मानले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!