फलटण टुडे वृत्तसेवा (दालवडी दि. २०) :-
श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालय दालवडी विद्यालयात श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यान व विद्यालयातील खेळाडूंना स्पोर्ट किटचे वाटप करण्यात आले फलटण एज्युकेशन सोसायटी च्या श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालय दालवडी या विद्यालयामध्ये श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री मदने सर यांनी श्रीमंत मालोजीराजे यांचे जीवन कार्य या विषयावर मालोजीराजे यांच्या जीवनातील शेती शिक्षण आरोग्य रोजगार शेतीसाठी पाणी या व अशा अनेक विषयांवर मालोजीराजांनी केलेल्या फलटण तालुक्यासाठी केलेल्या भरीव कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली
याप्रसंगी शांती काका सराफ अँड सन्स. सगुनामाता कन्स्ट्रक्शन्स प्रा लि. ए व्ही बी न्यूज तसेच राज ज्वेलर्स यांचे सौजन्याने हॉलीबॉल, खो खो, ॲथलेटिक्स खेळणाऱ्या 80 विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप करण्यात आले मान्यवरांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पोर्ट किटचे वाटप केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आभार मानले
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री नितीन शेठ गांधी फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री सी डी पाटील सर ए व्ही बी माझा न्युज संपादक श्री विजय भिसे सर प्राध्यापक श्री मदने सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेडगे सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कोलवडकर सर व आभार श्री तरटे सर यांनी मानले