
मुख्यमंत्री माझी शाळा मध्ये ज्ञानसागरचा तालुक्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल सन्मान करताना संस्थेचे पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती )
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्र.०१ या उपक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पहिल्या टप्पाच्या अभियानामध्ये बारामती तालुक्यात खाजगी शाळा गटात ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल सावळ या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून रोख रक्कम दोन लाख देऊन घोषित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सुमारे १७६ शाळांनी सहभाग घेतला होता, सर्व शाळांचे मूल्यांकन करून तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांकावर ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल, तर प्रथम क्रमांकावर विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा आणि तृतीय क्रमांकावर न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती या शाळांनी मिळविला.विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या इतर शाळांपैकी ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
एकंदरीतच शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थी प्रगती आणि शिक्षक गुणवत्ता यांबरोबरच इतरही निकषांवर मूल्यांकन करून शाळेने दुसरा क्रमांक मिळविला.या अभियानामध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुधीर सोनवणे, दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते विभागप्रमुख गोरख वनवे यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दीपक सांगळे, दीपक बिबे सीईओ संपत जायपत्रे व सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.