

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २५) :-
सातारा पोलीस विभागाने महिलांची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने ‘अभया’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सातारचे मा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या विचाराने केला असून त्या अंतर्गत फलटण शहरातील ऑटो रिक्षा ना ही आज फलटण उपविभागाचे डी. वाय. एस. पी. मा.राहुल धस साहेब तसेच फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा याचे मार्गदर्शन खाली फलटण शहर पोलीस स्टेशन कडून फलटण शहरातील सर्व ऑटो-रिक्षाना या उपक्रमांतर्गत QR कोड बसवले गेले आहेत. ऑटो-रिक्षा मधील QR कोड स्कॅन केल्यावर सातारा पोलीस कंट्रोल रूम ला स्कॅन करणाऱ्या च्या मोबाईल चे लोकेशन जाईल व कोणती ही महिला अडचणीत धोक्यात असल्यास त्यांना पोलीस मदत तात्काळ पोहचेल. असे फलटण उपविभागाचे डी. वाय. एस. पी. मा. श्री राहुल धस यांनी सांगितले.