
कै .श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करताना प्राध्यापक श्री एल सी वेळेकर प्राचार्य श्री मोहनराव नाळेव इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (हणमंतवाडी दि. 26) : –
हनुमंतवाडी येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज हणमंतवाडी येथे बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंती निमित्ताने मुधोजी महाविद्यालय फलटण चे प्राध्यापक श्री. एल. सी. वेळेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

यावेळी बोलताना मा. प्रा. एल. सी. वेळेकर यांनी कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे बालपण, तरुणपण , राजकीय व सामाजिक कारकीर्द, शैक्षणिक कार्य गरिबांसाठी मदत, कोयना धरण निर्मितीमध्ये असलेला मोलाचा वाटा, नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून झालेली शेतीमधील प्रगती व तालुक्याला लागलेला जो दुष्काळी पट्ट्याचा कलंक कॅनल मुळे पुसला गेला . या ठिकाणी पाणी आल्यामुळे कसे येथील माळरानावरती नंदनवन फुलले तसेच प्रतापगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात राजेसाहेबां चे असलेले योगदान व त्यांच्या कार्यकर्तृत्व व विचार तरुण पिढीसाठी कसे प्रेरणादायी आहेत हे यावेळी सांगितले व कै . श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेतला .

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभहस्ते कै.श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोहनराव नाळे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. एल सी वेळेकर व उपस्थित विविध मान्यवरांचे स्वागत प्राचार्यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दादासाहेब साळुंखे यांनी केले तर मान्यवर व उपस्थितांचे आभार सौ. कुमठेकर मॅडम यांनी मानले.