
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २७ ) :-
जीवन शक्ती बायोएनर्जी एलएलपी आयोजित नेपियर गवत (घास) किफायती शेतीसाठी उत्तम पर्याय असून याचा उपभोग प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे यासाठी फलटण येथे शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी. परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे .
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य. मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असून या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवृत्त संशोधन शास्त्रज्ञ, आनंद कृषी विद्यापीठ, (गुजरात) चे मा.डॉ.पी.सी.पटेल, बायोटेक्नॉलॉजिस्ट, पुणे. मा. डॉ. आरोही कुलकर्णी यांचे या परिसंवादात मार्गदर्शन लाभणार आहे .
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती , फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे चेअरमन.मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण चे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य मा.श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे
सदर कार्यक्रम शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल (शेती शाळा परिसर) फलटण पुणे रोड जिंती नाका, फलटण येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी यापरिसंवाद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे .