बारामती तालुका लॅब चालक संघटनेचे पदाधिकारी व दत्तात्रय पानवकर , प्रेमप्रकाश चौबे
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि.26): –
मेडिकल लॅब क्षेत्रातील नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान व या क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि त्यावरील उपाय यांची माहिती व्हावी यासाठी सह्याद्री डायग्नोस्टिक व बी. डी. इंडिया (सीरींज) यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती तालुक्यातील मेडिकल लॅब चालकांसाठी प्रशिक्षण व व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सह्याद्री डायग्नोस्टिक संचालक दत्तात्रय पानवकर व बी. डी. इंडिया चे मार्केटिंग प्रमुख प्रेमप्रकाश चौबे, बारामती तालुका लॅब संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रणमोडे सचिव राजेंद्र खराडे,योगेश नींबाळकर,प्रभा शिवप्रसाद, सौ मीनाक्षी देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध चाचण्यासाठी रुग्णाचे रक्त घेतल्यानंतर त्यास त्वरित रिलीफ भेटावा व गुणवत्ता दर्जात्मक लॅब क्षेत्रातील सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात म्हणून वेळ व पैसा वाचावा ,व रुग्णाच्या आणि लॅब चालकाच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे सह्याद्री डायग्नोस्टिक संचालक दत्तात्रय पानवकर यांनी सांगितले.बी. डी. इंडिया च्या माध्यमातून रुग्णांना सेवा देताना मेडिकल लॅब चालक हा महत्वाचा दुवा असल्याचे मार्केटिंग प्रमुख प्रेमप्रकाश चौबे, यांनी सांगितले. मेडिकल लॅब क्षेत्रामध्ये अनेक विविध नवीन नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञांचा वापर होत आहे त्यामुळे रुग्णाचे रिपोर्ट अचूक व कमी वेळेत मिळणार आहे त्यामुळे लॅब चालकांनी नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ लॅब टेक्निशियन शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.यावेळी विविध शंकाचे निरसन करण्यात आले.सूत्रसंचालन श्री सावळे पाटील यांनी केले आभार दत्तात्रय पानवकर यांनी मानले .