फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण नॅक पियर टीम दिनांक 30 सप्टेंबर व १ ऑक्टोबर 2024 रोजी भेट देणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी . एच . कदम व नॅक समन्वयक डॉ. टी . पी . शिंदे यांनी दिली आहे.नॅक म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद होय. नॅक ही देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मूल्यांकन करणारी व्यवस्था आहे. ही संस्था देशभरातील विद्यापीठे व विविध महाविद्यालय यांना भेट देऊन तेथील गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा यांच्या मूल्यांकनानुसार महाविद्यालयांना श्रेणी देत असते. या संस्थेमार्फत शैक्षणिक संस्थांचे बहुस्तरीय मूल्यमापन केले जाते. यामध्ये अभ्यासक्रम, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी असणाऱ्या सुविधा व गुणवत्ता या अशा अनेक बाबींचे मूल्यांकन करते. मुधोजी महाविद्यालय हे फलटण तालुक्यासह माण ,खटाव खंडाळा, कोरेगाव,माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी 1957 रोजी सुरू झालेले असून हे महाविद्यालय आत्ता चौथ्या सायकल ला सामोरे जाणार आहे, नॅक च्या चौथ्या सायकल ला सामोरे जात असताना महाविद्यालयाने उत्तम तयारी केलेली आहे . यामध्ये महाविद्यालया च्या सुसज्ज अशा इमारती, अद्यावत प्रयोगशाळा, प्रयोगशाळेतील आधुनिक साहित्य, अद्यावत ग्रंथालय, सुसज्ज खेळाचे मैदान, कॉलेज कॅन्टीन, सुसज्ज लॅबोरेटरीज,विविध गार्डन्स, अद्ययावत इनक्यूबेशन सेंटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अद्ययावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महाविद्यालयातील अंतर्गत रस्ते, महाविद्यालयातील सर्व 19 विभाग व विभागातील कर्मचारी, प्राध्यापक व विविध समित्यामार्फत नॅकशी संबंधित असणारी माहिती तयार करण्यात आलेली आहे. सदर सुविधा निर्मिती व नॅक संदर्भातील महाविद्यालयातील विविध कामे करीत असताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सदस्य यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे. सदर नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास..चांगले नामांकन मिळेल असा विश्वास प्राचार्य डॉ. पी. एच .कदम यांनी व्यक्त केला आहे.