फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि. 27 ) :-
कटफळ (ता: बारामती) येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचालित झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व या स्पर्धा इयत्ता नववी ते बारावी मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व लोकसंख्या शिक्षण अंतर्गत कला उत्सव स्पर्धा डॉ.मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृह,पुणे येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी मधील कु.ऐराॅन मेहरुमजी व कु.आयुष साळवे यांनी तात्या विंचू परतला या एकपात्री नाट्यांमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती.राजश्री तिटकारे अधिव्याख्याता व प्रा.बाळकृष्ण वाटेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. झैनबिया स्कूलच्या प्राचार्यां.इन्सिया नासिकवाला यांनी मार्गदर्शक पालक, शिक्षक अभिक्षित पगारे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.