विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी चे अधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
पुणे शहरात आयोजित 3 महाराष्ट्र आर्मड राष्ट्रीय छात्र सेना (CATC-720) एनसीसी कॅम्पमध्ये सावळ येथील ज्ञानसागर इंग्लिश मीडियम सीबीएसई व एसएससी बोर्ड स्कूलच्या एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आर्मड राष्ट्रीय छात्र सेनेचे तज्ञ वरिष्ठ रँक अधिकारी वर्ग, कॅम्प कमांडंट राजेश वाकरे, मंदारे अंकुश(Sr JCO), यु एन राव (CHM), सुशील कुमार (CHM/Trg NCO), महेनतेश पाटील (Amn NCO), मिलिंद घाडगे(kote NCO), शेरसिंग राठोर (QM) यांकडुन प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे.कु.संस्कृती झगडे,सृष्टी शेलार,श्रेया सुतार,प्रांजली निगडे,स्वरा टकले,तनवी लकडे,आकांक्षा बंडगर,समीर घुले,सार्थक माने,आदित्य काशीद,रोशन रॉय,कुणाल बंडगे,लक्ष्मण चौधरी,श्रेयस झगडे,संस्कार झगडे,मनोज भंडारी,यश गाडेकर,किरण काळे,भीमशंकर भंडारी,सिद्धेश झगडे,प्रवीण दराडे,दक्ष कांबळे व मयूर पडळकर या विद्यार्थ्यांची निवड झाली.या कॅम्पमध्ये रायफल शूटिंग, परेड, झेंडावंदन, स्वच्छता अभियान, ड्रिल मार्च व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिस्त, वेळेचे महत्व, कष्ट, जबाबदारी, लीडरशिप अशा कित्येक गुणांचा विकास यामधून होणार आहे. एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये प्राधान्य दिले जाते याचा फायदा मुलांना शिस्त व स्वछता,कार्यपद्धती चा जीवनात व शिक्षणात खूप होतो त्यासाठी एनसीसी चे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे प्रा सागर आटोळे यांनी सांगितले.