फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
शुक्रवार २७ सप्टेंवर रोजी बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी मा. सौ .सुप्रिया बांदल यांना सकल हिंदू समाज व मल्हार क्लब यांच्यातर्फे कृषी विभागातील भरीव योगदानाबद्दल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कार्यगौरव पुरस्कार सन २०२४ जाहीर करण्यात आला. सौ.सुप्रिया बांदल यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली तसेच सर्वसामान्य शेतकरी यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचीही सोडवणूक केल्याने कृषि विभागाकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात तालुका कृषी अधिकारी यशस्वी झाल्या आहेत.मल्हार क्लब बारामती अध्यक्ष ॲड .श्री.गोविंद देवकाते यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी बारामती चे तहसीलदार श्री. गणेश शिंदे आणि इतर पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.