वरदा कुलकर्णी व सारंग सूर्यवंशी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि. ३०): –
वीर सावरकर जलतरण तलाव येथील खेळाडूंची चे पॅरा ऑलंपिक स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी पॅरा ऑलंपिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत जलतरण स्पर्धा कल्याण मुंबई येथे २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या दरम्यान पार पडल्या यामध्ये बारामती वीर सावरकर जलतरण तलाव येथील जलतरणपटू कुमारी वरदा संतोष कुलकर्णी व कु.सारंग प्रविण सूर्यवंशी यांनी नेत्र दीपक कामगिरी केले वरदा कुलकर्णी १०० मीटर हे स्टाईल मध्ये सुवर्ण २००मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्ण व १०० मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच कु. सारंग प्रविण सूर्यवंशी याने ५०मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्ण ५९ मीटर ब्रेक स्टोक मध्ये सुवर्ण व१०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये रजत पदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांची पणजी गोवा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.वरदा कुलकर्णी ही आयर्न मॅन ओम सावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल जलतरण तलावाचे अध्यक्ष डॉक्टर तांबे , सचिव विश्वास शेळके , खजिनदार मिलिंद अत्रे व सर्व विश्वस्त मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फ