प्रशालेत महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करताना प्राचार्य सुधीर अहिवळे , उपप्राचार्य नितीन जगताप व शिक्षकवृंद
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०२ ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंतीनिमित्त प्रशालेचे मा. प्राचार्य श्री सुधीर अहिवळे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विद्यालयांमध्ये साजरी करण्यात आली
यावेळी अध्यक्षिय भाषणात बोलताना प्रशालेचे प्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे यांनी सांगितले की दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशात गांधी जयंती साजरी केली जाते. तसेच संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन म्हणून साजरा केला जातो. २ ऑक्टोबर १८६९ मध्ये गुजरातच्या पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. आज संपूर्ण जग त्यांना महात्मा आणि भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखते. दुसरे महान विभूती भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसी पासून सात मैल दूर मुघलसराई या छोट्या गावात झाला त्यांनी जय जवान जय किसन हा नारा दिला. अशा प्रकारे आपले विचार त्यांनी मांडले .
याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री नितीन जगताप , शिक्षक प्रतिनिधी श्री संतोष तोडकर , श्री सतिश नाळे , बापूराव सूर्यवंशी , श्री अनिल यादव,श्री अमोल रणवरे , श्री क्षिरसागर , कु. प्रियांका सूर्यवंशी व महिला शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्री संतोष तोडकर यांनी मानले.