फोटो 1 – प्रशालेच्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघाबरोबर प्राचार्य सुधिर अहिवळे , नितीन जगताप , सोमनथ माने , अमोल नाळे , प्रितम लोंढे
फोटो 2 -प्रशालेच्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघाबरोबर प्राचार्य सुधिर अहिवळे , नितीन जगताप , सोमनथ माने , दिलीप जाधव , प्रितम लोंढे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. 02) :-
तालुकास्तरीय 14,17 आणि 19 वर्षाखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धा फलटण येथील माजी आमदार कै. शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकूल , फलटण येथे रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाल्या .
या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की खेळाडू ने मेहनत , कष्ट व चिकाटी अंगी जोपासल्या यश हे नेहमी मिळत असते खेळामुळे आपले आयुष्य आनंदी व दीर्घायुषी होण्यास मदत होते तसेच व्यायामाची सवय लागल्यामुळे शरीराला एक प्रकारे शिस्त येते.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ , आयोजक श्री संदीप ढेंबरे , श्री अमित काळे , श्री प्रीतम लोंढे , श्री सुजित जमदाडे , श्री कुमार पवार , सौ. गेजगे , श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमी चे प्रशिक्षक श्री सोमनाथ चौधरी तसेच अविनाश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक सामने अतीतटीचे झाले तर काही एकतर्फी झाले यामधे मुधोजी हायस्कूल संघाने सलग दोन सामने जिंकून 19 वर्षाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज विरुद्ध मालोजीराजे शेती विद्यालय , फलटण यांच्यामध्ये हा सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मालोजीराजे शेती विद्यालयाने 6 षटकामध्ये 34 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना मुधोजी हायस्कूल संघाने 4 षटकामध्ये बिनबाद 35 धावा करून सामना जिकंला.
या सामन्यांमध्ये मुधोजी हायस्कूलच्या वतीने यशराज मदने, सृजन बिचुकले,प्रथमेश कदम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने 19 वर्षाखालील तालुकास्तरीय शालेय ( मुले ) क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरत जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला.
क्रिकेट संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण चे चेअरमन मा. रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासनाधिकारी श्री अरविंद निकम , तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनिअर चे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पुजा पाटील यांनी संघातील खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित फलटण क्रिकेट ॲकॅडमी ऑफ चॅम्पियन्स चे क्रिकेट प्रशिक्षक श्री अशोक गाडगीळ, साहाय्यक श्री अविनाश कांबळे , मुधोजी हायस्कूलचे क्रीडा मार्गदर्शक श्री प्रितम लोंढे यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .