नेपियर गवत किफायत शेतीसाठी उत्तम पर्याय – मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. ०२ ) :-

जीवन शक्ती बायोएनर्जी एलएलपी आयोजित नेपियर गवत पिक परिसंवाद कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नेपियर गवत हे किफायत शेतीसाठी उत्तम पर्याय आहे, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यासाठी जनावरांच्या दुग्ध उत्पादन वाढीसाठी, नेपियर गवतापासून तयार करण्यात येणारे इतर उप उत्पादन, चारा पिक म्हणून तसेच शेतकऱ्यांनी मुख्य ऊस पिकाचा भार कमी करून नेपियर गवत पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यावे असे आवाहन पिक परिसंवादासाठी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नेपियर गवताची ओळख, चारा पीक, नेपियर लागवड पद्धत, नेपियर गवताचे उपयोग या विषयावर प्राथमिक माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक डॉ. पी. सी. पटेल, निवृत्त संशोधन शास्त्रज्ञ, आनंद कृषि विद्यापीठ, गुजरात यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नेपियर गवताची लागवड पद्धत, हवामान, खत व्यवस्थापन, आंतर मशागत, पाणी व्यवस्थापन, नेपियर गवताची कापणी, नेपियर गवताचा व्यावसायिक उपयोग या विविध विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. आरोही कुलकर्णी, बायोटेक्नॉलॉजिस्ट, पुणे यांनी नेपियर गवताचा उगम, संकर पद्धत, संकरातून अधिकतम ठोंबे उत्पादन, ठोंबे निवड पद्धत, नेपियर गवताचे फुटवे व्यवस्थापन, नेपियर गवताचे भरघोस उत्पादन पद्धत या विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर शेतकऱ्यांना नेपियर गवत लागवड संबधित असणाऱ्या शंकांचे तज्ञाकडून निरसन करण्यात आले. नेपियर गवत लागवड पद्धतीचे पिक प्रात्यक्षिक शेती विभागातील प्रक्षेत्रावर घेण्यात आले. सदरील कार्यक्रमाला मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबळकर, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबळकर, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सदस्य, श्री. धनंजय पवार, अध्यक्ष, फलटण तालुका सहकारी दुग्ध संघ, श्री. बाळासाहेब शेंडे, चेअरमन, श्रीराम सहकारी कारखाना, फलटण, श्री. भाटे एस. एम, श्री शितोळे एस. के., श्री. ठोंबरे के. आर., डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. वेदपाठक सर, प्राचार्य, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटण, शेतकरी, वृत्तपत्राचे पत्रकार, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री शिंदे व आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी व्यक्त केले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!