‘लाभले आम्हास भाग्य…’ मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा
फलटण टुडे वृत्तसेवा दि ०३ :-
महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या मागणीला मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
- पाच भाषांना अभिजात दर्जा : मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजात भाषांची एकूण संख्या 11 वर पोहचली आहे.
- यापूर्वी संस्कृत, तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा मिळाला आहे. सर्वप्रथम तामिळ भाषेला 2004 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर यापूर्वी ओडिया ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली शेवटची भाषा आहे. 2014 साली ओडियाला हा दर्जा मिळाला आहे.