तीन कुस्तीपटूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूं समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शिवाजीराव घोरपडे शिवाजीराव घोरपडे प्राचार्य सुधीर अहिवळे , नितीन जगताप ,सचिन धुमाळ , अमोल नाळे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. 05) :-
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. 20 व शनिवार 21सप्टेंबर 2024 रोजी खंडाळा येथील राजेंद्र विद्यालय , खंडाळा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटणच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली .

सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटातील तिन खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये समर्थ संतोष शिंदे यांने 65 किलो वजनी गटात सलग दोन कुस्त्या जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करून प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडलचा मानकरी ठरला तसेच दुसऱ्या दिवशी पाटपडलेल्या 17 व 19 वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन आणि 14,17 व 19, वर्षांखालील मुलींच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये दोन मुले आणि फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत चार मुली अशा एकूण 6 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .
मुलींच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत कु. गौरी रमेश चव्हाण हिने 65 किलो मुलींच्या गटात झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडू वरती मोठ्या गुणांच्या फरकाने मात करत प्रथम क्रमांक मिळविला व गोल्ड मेडल ची मानकरी ठरली तर कु श्रुती नवनाथ चव्हाण हिने 69किलो वजनी गटात सलग दोन कुस्त्या जिंकून फायनलमध्ये कराडच्या प्रतीस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व गोल्ड मेडल प्राप्त केले .
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीपटूंना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, माध्यमिकचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी कुस्तीपटूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक (वस्ताद )श्री डी. एन. जाधव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत