फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ०७ ): –
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर येत्या दोन दिवसात अजित पवार यांची भेट घेणार असून फलटण तालुक्यातील कार्यकर्त्याच्या व्यथा त्यांच्या समोर मांडणार आहेत त्यानंतर फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येईल असे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.खटके वस्ती तालुका फलटण येथील कार्यक्रमांमध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर भाषणात श्रीमंत रामराजे यांच्या पुढे भाजप नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्या व्यथा मांडल्या होत्या आपण महायुतीत राहून जर आपल्याला योग्य तो सन्मान मिळत नसेल आपल्याला त्रास देण्याचे व खोटे गुन्हे दाखल करण्याचे आणि ईडीच्या धमक्या देण्याचे प्रकार चालत असतील तर आपण महायुतीतून बाहेर पडून पुढील राजकीय निर्णय घेण्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले होते.यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले होते येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटून कार्यकर्त्यांच्या व्यथा सांगणार आहे त्यामध्ये कुठलाही फरक पडला नाही तर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांना भेटून येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत.