जिजाऊ सेवा संघाच्या पाककला स्पर्धेत ‘मोनिका आगवणे’ प्रथम

विविध स्पर्धेमधील विजेत्यांचा सन्मान करत असताना जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी व उपस्थित मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने नवरात्र निमित्त भोंडला, व दांडिया पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, पोर्णिमा तावरे व मा. सभापती डॉ.सुहासनी सातव आणि छाया कदम, संगीता शिर्के, कल्पना शिंदे , जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्षा स्वाती ढवाण,उपाध्यक्षा मनीषा शिंदे,कार्यध्यशा सुनंदा जगताप, व भारती शेळके,कल्पना माने, ,वीणा यादव, विद्या नींबाळकर,सारिका मोरे, वंदना जाधव,सुवर्णा केसकर, ऋतुजा नलवडे, पूजा खलाटे ,संगीता साळुंखे ,गौरी सावळेपाटील,राजश्री परजने,मनीषा खेडकर आदीमान्यवर उपस्तीत होत्या भोंडला स्पर्धेसाठी देवी व हत्तीचे च्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. दांडिया व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम मोनिका आगवणे द्वितीय हर्षदा मोरे तृतीय छाया पाटील, उत्तेजनार्थ सोनल बाबर, कलावती चितारे, प्रीत बवेजा यांनी पाककला स्पर्धेत बाजी मारली .अत्याधुनिक युगात भारतीय संस्कृती सण, उत्सव, परंपरा आदी विसर पडू नये व महिलांच्या कला,गुणांना वाव मिळावा या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुनंदा जगताप व भारती शेळके यांनी केले. आभार उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!