
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे श्री प्रल्हाद गुलाबराव वरे रा-मळद ता- बारामती जि-पुणे यांना सेंद्रिय शेती व विषमुक्त शेती मधील राज्यातील सर्वोच्च असा “कृषीभुषण सेंद्रिय शेती” हा पुरस्कार दि. २९.०९.२०२४ रोजी वरळी-मुंबई येथे मा राज्यपाल श्री. सी. पी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार तसेच मा. कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी बारामती कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील अधिकारी वर्ग तसेच माझे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रल्हाद वरे हे शेतात विषमुक्त पद्धतीने करत असलेली वेगवेगळी पिके, नैसर्गिक पद्धतीने कीड रोग व्यवस्थापन, जैविक व सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन, ताग धैंच्या यांसारखी हिरवळीचे पिके, रोपांची लागवड , उसाची पाचट, शेतातील काडीकचर्याची कुट्टी करून शेतात गाडली जाते, किडींसाठी विविध सापळ्यांचा वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी शहरांमध्ये विविध ठिकाणी स्टॉल लावून विक्री केली जाते, शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था तसेच भाजी बास्केट होम डिलिव्हरी व्दारे पुरवठा, बारामती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मधील सभासद शेतकऱ्यांना पर्यावरण पुरक गोबरगॅस, सोलर वॉटर हिटर कुठल्याही मध्यस्थाशिवाय माफक दरात घरपोच पुरवठा केला आहे, जमीन सुपीकते करीता शेणखत, नाडेफ, गांडूळ खत, वर्मिवाॅश कंपोस्ट तसेच भुसुधारकांचा वापर, कार्यक्षम पाण्याच्या वापरासाठी शेततळे, ठिबक, तुषार सिंचन, क्राॅफ कव्हर व मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पाण्याची व पिकातील तंणाची मोठी बचत होऊन मजुरी खर्च व खुरपणी खर्च अत्यल्प येत आहे, अशा सर्व कार्यामुळे विवीध वर्तमान पत्राने व टिव्ही चॅनेलने त्यांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेऊन प्रसीद्धी दिलेली आहे, त्यांनी आजपर्यंत इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व मार्केटिंग बदल केलेल्या मार्गदर्शनामुळे शेकडो शेतकरी विक्रेते झाले आहेत, अशा दिशादर्शक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे, पुरस्कार वितरण समारंभासाठी त्यांच्या समवेत सहभागी झालेले सहकारी त्यांच्या पत्नी सौ संगीता प्रल्हाद वरे, सौ सुनीता बलभीम टाकळे, श्री बलभीम टाकळे, श्री कल्याण काटे, श्री किरण काळे, श्री अशोक वरे व श्री नितीन तावरे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.