
ज्ञानसागर चे स्केटिंग क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
महाराष्ट्र शासन जिल्हा क्रिडा परिषद, पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित जिल्हास्तरीय स्केटींग क्रिडा स्पर्धा दि.05 व 06 ऑक्टोबर रोजी मनपा स्केटिंग रिंग, विमाननगर,पुणे येथे पार पडल्या. बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलमधील सहा विद्यार्थ्यांनी 13 पदक जिंकले. यामध्ये कु.श्रेया रंजीत गोरे हिने 14 वर्ष वयोगटात तीन सुवर्ण पदक, कु.श्रेया श्रीपती झगडे हिने 14 वर्ष वयोगटात दोन रौप्य पदक व एक कांस्य पदक , वरद आकाश रुपनवर 17 वर्ष वयोगटात तीन रौप्य पदक, शौर्या जीवन वाळुंजकर 11 वर्ष वयोगटात दोन कांस्य पदक, कु.आराध्या अमोल झगडे 14 वर्ष वयोगटात दोन रौप्य पदक मिळाल्याबद्दल या पाचही विद्यार्थ्यांची शासकीय विभागीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक ललित लोखंडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सागर मानसिंगराव आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे , सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक सुधीर सोनवणे दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप व सर्व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फ