
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वा. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती *फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे. खालील कामाचा शुभारंभ होणार १) ऋषीराज कॉलनी ते येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे २३ लाख ९३ हजार ९३५ रु २) पेठ महतपुरा श्री शंभुराज कदम घर ते कर्णे घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे ९१ लाख ६६ हजार ६०७ रु. ३) साईबाबा मंदिर स्वागत कमान ते बर्गे गॅरेज रस्ता करणे २५लाख २ हजार ८५२ रु. ४) उदय मांढरे घर ते प्रवीण घनवट घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १५लाख ७९ हजार ७१४ रु. ५) सद्गुरु हरिभाऊ महाराज मंदिर नजीक बाणगंगा नदी रिटर्निंग हॉल बांधणे ६५ लाख करणे