
फलटण टुडे वृत्तसेवा (सस्तेवाडी दि. १४) : –
कन्यापूजन हिंदू धर्मातील एक महत्वाची ‘रित आहे. जी विशेषतः नवरात्री आणि दुर्गापूजा दरम्यान केले जाते. या पूजे-दरम्यान मुलींना देवीचा अवतार मानून पूजन केले जाते. यासोहळ्या दरम्यान मुलींना आशीर्वाद दिला जातो आणि भेटवस्तू ,खादय पदार्थ दिले जातात.
या परंपरेद्वारे मुलींच्या शिक्षण आणि हक्कांच्या महत्वावर प्रकाश टाकला जातो. कन्यापूजन ही एक सुंदर परंपरा आहे. जी श्रद्धा आणि सन्मानाने भरलेली आहे. आणि एकसकारात्मक संदेश समाजामध्ये प्रस्थापित करते.अशा या उपक्रमाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर सस्तेवाडी, प्रशालेमध्ये आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमनमा. सौ. नुतन अजितराव शिंदे या उपस्थित होत्या . तसेच प्रशालेतील महिला पालकांनी या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. व प्रशालेतील सर्व कन्यांचे पूजन केले. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा दरम्यान प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून सामाजिक विविधतेचा संदेश दिला. तसेच सर्व महिला पालकांसाठी भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रशालेच्या चेअरमन मा. सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन मा. सौ नुतन अजितराव शिंदे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर, सर्व शिक्षिका, महिलापालक उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी सर्व महिला पालकांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.’या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्ताने आयोजित केलेल्या उपक्रमाने एक सकारात्मक सामाजिक संदेश पसरविण्यात आला. या उपक्रमाचे प्रशालेच्या चेअरमन व्हाई मा. सौ वसुंधरा राजीव नाईकनिंबाळकर व व्हाईस चेअरमन मा. सौ नुतन अजितराव शिंदे तसेच प्रशालेतील महिला पालक यांनी विशेष कौतुक केले.
चौकट .. : –तसेच यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून यावेळी प्रशालेमध्ये चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्साहात सहभाग नोंदवला .