वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी माहिती घेत असताना लडकत स्कूलचे विद्यार्थी
** फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन आणि ज्युनियर कॉलेज, बारामती येथील ११वी व १२ वीच्या नीट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागतिक अॅनाटॉमी दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे भेट दिली. या विशेष प्रसंगी च्या अॅनाटॉमी विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. अंजली पाटील मॅडम, सहयोगी प्राध्यापिका डॉ. गीतांजली सूडके यांनी देहदान आणि त्याचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच उपअधिष्ठाता डॉ. भालेराव मॅडम यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी शरीररचनाशास्त्र विभागातील अवयव प्रदर्शनाला भेट देऊन त्याबद्दल सखोल माहिती घेतली, प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी महाविद्यालययाच्या २०२३-२४ एमबीबीएस बॅचच्या विध्यार्थ्यांनी मानवी शरीरशास्त्र व अवयव दानाबद्दल प्रात्यक्षिकासह सखोल माहिती दिली.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. सुजाता भालेराव , डॉ. पाटील मॅडम, डॉ. सुडके आणि तंत्रज्ञ् श्री सोमनाथ भारती , डॉ.अतुल, डॉ. वृंदा, डॉ. करण यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन केले. तलडकत स्कूल ऑफ फाउंडेशन आणि ज्युनियर कॉलेज बारामती तर्फे प्रफुल्ल आखाडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती प्रशासन यांचे आभार व्यक्त केले, प्रसंगी लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन चे अध्यक्ष नामदेव लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, मनोज काळे सर, सौ.प्राजक्ता , श्री.पोले सौ.सपना आदी शिक्षक उपस्थित होते ,तसेच या शैक्षणिक दौऱ्याने विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणाची आवड आणि उत्सुकता आणखी वाढल्याचे अध्यक्ष नामदेव लडकत यांनी सांगितले –——————–/-