मनोज तुपे व अनिता तुपे यांचा सत्कार करताना अधिकारी व कर्मचा
रियल व फॉर्च्यून डेअरी च्या वतीने बोनस जाहीर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती:) –
कर्मचारी व अधिकारी हे कंपनीचा महत्त्वपूर्ण भाग असून कंपनीच्या विकासात त्यांचे योगदान म्हतपूर्ण आहे म्हणून त्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रियल व फॉर्च्यून डेअरीचे चेअरमन मनोज तुपे यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील
रियल डेअरी इंडस्ट्रीज प्रा. लि. बारामती व फॉर्च्यून डेअरी इंडस्ट्रीज प्रा. लि. इंदापूर मधील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी निमित्त कंपनी प्रशासनाच्या वतीने ६० ते ७० टक्के बोनस जाहीर करण्यात आला त्यानंतर कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने चेअरमन मनोज तुपे व कार्यकारी संचालिका अनिता तुपे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्काराला उत्तर देत असताना मनोज तुपे यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी प्रेसिडेंट प्रशांत अपराजित, डेप्युटी जनरल मॅनेजर निलोत्पाल सिंग, असि जनरल मॅनेजर कुणाल कापसे, एच आर मॅनेजर सुशांत शिर्के, फायनान्स मॅनेजर प्रीतम पारखे, परचेस मॅनेजर अजिंक्य परकाळे, दुध संकलन मॅनेजर प्रविण तावरे आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते .
वाढती महागाई, बाजारपेठ मधील मंदी, वाढती स्पर्धा आदी कारणाने दूध डेअरी क्षेत्राला आर्थिक फटका बसत असताना कर्मचारी व अधिकारी वर्षभर उत्कृष्ट पणे कामगिरी करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बोनस देत असल्याचे
कंपनीचे चेअरमन मनोज तुपे यांनी सांगितले.
कंपनी प्रशासन नेहमी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहे व वर्षभरात विविध उपक्रम राबवत असताना दिवाळी गोड करत असल्याबद्दल कर्मचारी व अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
————-/——