खेळाडूचा सत्कार करताना मान्यवर व प्रशिक्षक
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):–
दि.२७ व २८ सप्टेंबर रोजी क्राईस्ट अकॅडमी स्कुल कोपरखैरणे मुबंई या ठिकाणी झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामीण मध्ये बारामती संघाने दुसरा क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण समारंभ इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले व आय पीएस फि चे संचालक अनुज सरनाईक, महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशन चे संचालक साहेबराव ओहोळ, तृप्ती बनसोडे, अरविंद शिर्के, सदस्य पौर्णिमा तेली सुहास पाटील, संकेत धामण्डे , मुकेश सोनावणे इत्यादीच्या हस्ते संपन्न झाला.
बारामती तालुक्यातील एकूण ५५ खेळाडूंची निवड झाली होती. या खेळाडूंनी रेग्यु, तुंगल, सोलो, टँडिंग( फाईट ), गंडा इत्यादी इव्हेंट मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील एकूण ६२५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला या सर्व जिल्ह्यात पुणे ग्रामीण जिल्ह्याने २२ गोल्ड, १३ सिल्वर आणि १८ ब्रॉन्झ पदक मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. क्रमांक आपल्या नावे केला. मुंबई संघाने प्रथम व सांगली जिल्हा तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व खेळाडूं ना ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन च्या माध्यमातून योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी प्रशिक्षक संचालक साहेबराव ओहोळ मार्गदर्शन करतात यातील १५ खेळाडू ची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
चौकट:
५% खेळाडू कोटा राखीव
पिंच्याक सिलेट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून (१) इंडिंग (फाईड) (२) तुगल (सिंगल काता)
(३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट), (५) सीलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० हा या सखेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखिव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला “युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविदयालय संच”, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कांउसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, पुथ गेम व ऐशियन थिय गेम, भारतीय विश्वविदयालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो:
साहेबराव ओहोळ
प्रशिक्षक,बारामती