
श्रीमंत संजीवराजे व दीपकराव चव्हाण , सह्याद्री कदम यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार )पक्षात प्रवेश केलेलले दुधेबावी ग्रामपंचायत सदस्या वर्षाताई सोनवलकर , सोसायटी सदस्य रोहिदास सोनवलकर ,सुखदेव सोनवलकर,श्रीरंग सोनवलकर व इतर मान्यवर

दुधेबावी येथे उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे व ग्रामस्थ व इतर मान्यवर
फलटण टुडे (दुधेबावी रोहित सोनवलकर ):-
दुधेबावी तालुका फलटण येथे सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी गावातील भाजप पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात ( राजे गट ) जाहीर प्रवेश केला .
यामध्ये ग्रामपंचायत सदस्या वर्षाताई सोनवलकर , सोसायटी सदस्य रोहिदास सोनवलकर ,सुखदेव सोनवलकर,श्रीरंग सोनवलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला .
यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा.आमदार दीपकराव चव्हाण ,यूवा नेते सह्याद्री कदम,माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे,मोहनराव डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.