फलटण टुडे (फलटण दि. ५) –
निवडणूक आयोगाच्या आदेशाने फलटण-कोरेगाव
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून नूह पी. बावा
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दि. २९ ऑक्टोबर रोजी
फलटण येथे दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या नूह पी.बावा यांचे वास्तव्य अधिकार गृहासमोरील शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी कक्षात आहे.
त्यांना भेटण्यासाठी सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता रविकुमार अंबेकर यांच्याशी संपर्क साधावा. नूह पी. बावा यांना भेटण्याची वेळ रोज सकाळी ९ ते १० अशी आहे, असे कळविण्यात आले आहे.