मानवबंध फाउंडेशनच्या वतीने दिवाळी भेट

दिवाळीनिमित्त फराळ आणि कपडे वाटप करत असताना मानवबंध फाउंडेशनचे सदस्य


फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी):-
येथील मानवबंध फाउंडेशनच्या वतीने शनिवार दि.02 नोव्हेंबर रोजी भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडीसाठी आलेल्या मजदूर मुलांना व स्त्रियांना दर्जेदार कपडे ,साड्या आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.

या प्रसंगी मानवबंध फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुषमा चव्हाण,संस्थेचे सचिव करण नानासो चव्हाण , उपाध्यक्ष सदाशिव पाटील, खजिनदार सौ विद्या संदीप जगदाळे , सदस्य मालन लक्ष्मण चव्हाण व कारखान्याचे कामगार संघटना पदाधिकारी व ठेकेदार उपस्तीत होते.
गोर गरिबांना सुद्धा दिवाळीचा गोडवा मिळावा व दिवाळी च्या माध्यमातून माणुसकी जपण्याचे काम होत राहते एक सामाजिक बांधिलकी म्हणून दर वर्षी हा उपक्रम राबवत असल्याचे अध्यक्ष सुषमा चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले. आभार विद्या जगदाळे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!