संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेच्या” संत चरित्र ” विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

फलटणटुडे वृत्तसेवा (फलटण):: –
भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव दरबार कमिटी श्री क्षेत्र घुमाण आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेच्या ” संत चरित्र ” हिंदी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी . राधाकृष्णन यांचे हस्ते करण्यात आले .
राजभवन मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्थ योगी निरंजननाथ , शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , खजिनदार मनोज मांढरे , पालखी सोहळा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र मारणे , नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्थ राजेंद्र पोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
राज्यपाल सी . पी . राधाकृष्णन यांनी संत नामदेव रथ व सायकल यात्रेबाबत गौरोवोद्गार काढले . ते म्हणाले , विठ्ठलाच्या दर्शनाची मलाही आस आहे . या विठ्ठलाचे भक्त व संतांचे कार्य महान आहे . हे कार्य जगभर पोहोचले पाहिजे . भागवत धर्म प्रसारक मंडळ हिंदी भाषेत हे संत साहित्य प्रकाशित करीत आहे ही आनंदाची बाब आहे .
या अंकाविषयी बोलताना सूर्यकांत भिसे म्हणाले , महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे . शांती , समता व बंधूता हा विचार संतांनी दिला . संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रासह देशभर भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला . निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान , मुक्ताबाई , नामदेव , एकनाथ , तुकाराम या संतांचे जीवन चरित्र हिंदीमध्ये उपलब्ध व्हावे या हेतुने ” संत चरित्र ” हा हिंदी भाषेतील अंक प्रकाशित केला .
योगी निरंजननाथ म्हणाले , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे कार्य अद्वितीय आहे . संत ज्ञानोबाराय व नामदेवराय यांच्या नंतर इतिहासात पहिल्यांदाच मराठी भाषिकांनी इतर राज्यांमध्ये जावुन वारकरी पंथ कृतीतुन आणि हिंदी भाषेच्या माध्यमातुन उभा करीत आहेत . श्री क्षेत्र घुमाण येथे उभे राहणारे भव्य संत नामदेव भवन ही घुमाण रथ ब सायकल यात्रेची उपलब्धी आहे .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!