उद्या श्रीराम मंदिर येथे दीपक चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ व मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

फलटण टुडे (फलटण):-

२५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभा चा नारळ

उद्या गुरुवार दि.०७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता श्रीराम मंदिर फलटण येथे संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे फलटण येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही यावेळी संपन्न होणार असून दीपक चव्हाण यांच्या प्रचाराचा खरा झंजावात उद्यापासून सुरू होणार आहे . याप्रसंगी फलटण तालुक्यातील राजे गट तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी असंख्य संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रचार प्रमुखांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!