फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.8): –
शिक्षक पात्रता परिक्षा सातारा शहरातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे. या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले आहे.
ही परिक्षा सातारा शहरातील 1) छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, 2) लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा, 3) महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा, 4) श्रीपतराव पाटील हायस्कुल, 5) आण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, 6) यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा, 7) अनंत इंग्लिश स्कूल सातारा, 8) कन्या शाळा सातारा, 9) छत्रपती शाहू अॅकॅडमी सातारा, 10) सुशीलादेवी कन्या प्रशाला सातारा, 11) आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, 12) भवानी विद्यामंदिर सातारा, 13) न्यु इंग्लिश स्कुल सातारा या परीक्षा केंद्रावर होणार आहे.
दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 07.00 ते सांयकाळी 06.00 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या परीक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालचे 100 मिटर परिसरात परिक्षार्थी, परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी/कर्मचारी, सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आले आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विद्यालय / महाविद्यालयाचे परिसरातील सार्वजनिक टेलिफोन/एस. टी. डी. बुथ/आय. एस. डी. बुथ फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परिक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परिक्षा क्रेंदात नेण्यास आदेशान्वये मनाई करीत आहे.