बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर सदाशिव पाटील व खंडोजी गायकवाड यांची निवड

सदाशिव पाटील व खंडोजी गायकवाड यांचा सन्मान करत असताना धनंजय जामदार

फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी)::-


बारामती एमआयडीसीतील भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सदाशिव पाटील व कॉटनकिंग कंपनीचे उपाध्यक्ष खंडोजी गायकवाड यांची बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर (Executive Council Member ) सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक रविवार दि.१० ऑक्टोम्बर रोजी संपन्न झाली
या प्रसंगी अध्यक्ष धनंजय जामदार उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर, महादेव गायकवाड, हरीश कुंभारकर, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, राजन नायर यांच्यासह सदाशिव पाटील व खंडोजी गायकवाड उपस्थित होते.

बारामती परिसरातील सहाशे हून अधिक लहानमोठ्या उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारी बिडा ही एकमेव स्थानिक औद्योगिक संस्था असून उद्योगाचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. असोसिएशनने केंद्र सरकारचे ईएसआयसी हॉस्पिटल, बारामतीसाठी एमआयडीसीचे स्वतंत्र नवीन प्रादेशिक कार्यालय आदी महत्वाच्या सुविधा मंजूर करून घेतल्या आहेत व
बारामतीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कृषी व औद्योगिक मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक अत्यंत महत्त्वाचे ड्राय पोर्ट (DRY PORT), लॉजिस्टिक पार्क (Logistics Park) तसेच आय टी पार्क (IT Park) मंजूर करावा यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. बारामती परिसरातील बेरोजगारांना स्थानिक कंपनीत नोकऱ्या मिळवून देण्यासाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज कार्यान्वित करणे तसेच उद्योगव्यवसाय व स्वयंरोजराला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकता विकास केंद्र लवकरच चालू करण्यात येणार आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घेतला असून तयारी करण्यात येत आहे अशी माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी दिली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन उद्योगांसाठी अत्यंत प्रभावीपणे काम करत असून या माध्यमातून होणाऱ्या बारामतीच्या सर्वांगीण औद्योगिक विकासामध्ये आम्ही भरीव योगदान देऊ अशी ग्वाही सदाशिव पाटील व खंडोजी गायकवाड यांनी यावेळी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!