फलटण टुडे (फलटण)::-
आज पंढरपूर हुन घुमान(पंजाब)येथे जाणाऱ्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सायंकाळी आगमन झाले यावेळी शिंपी समाजाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी फलटण ना स प चे अध्यक्ष करण भांबुरे, विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे, माजी अध्यक्ष महेश हेंद्रे, विजय उंडाळे,मोहन जामदार, ट्रस्ट चे सचिव अविनाश कुमठेकर,श्रीकांत मुळे, शेखर हेंद्रे, राजेंद्र गाठे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ अंजली कुमठेकर, खजिनदार अश्विनी हेंद्रे,पत्रकार संजय जामदार,मनीष जामदार,श्रीकांत राजेंद्र पोरे,मंगेश पोरे,राहुल जामदार,योगेश भांबुरे, राजेंद्र कुमठेकर,मिलिंद गाठे,महेश उरणे,यशराज भांबुरे यांच्या सह नामदेव भक्त समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे चरण पादुका रथ व सायकल वारी आल्या नंतर सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे यांचे व भाजनकरी बांधवांचे फलटण ना स प चे अध्यक्ष व समाज बांधव यांचे हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
या रथ सोहळ्याचे व सायकल वारीसह
क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत संत नामदेव महिला मंडळाच्या वतीने!विठ्ठल विठ्ठल विठ्ठला!या तालावर महिलांनी “पाऊली”या नृत्याचा आविष्कार सादर केला,पालखी सोहळा व सायकल वारी ची मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक,बारामती चौक विठ्ठल मंदिर येथे आल्यानंतर करण भांबुरे यांनी डोक्यावर संत नामदेवांच्या पादुका घेतल्या यावेळी महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केल्या नंतर संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांचे हस्ते करण्यात आल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त,शिंपी समाज बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.आज दिं 13 रोजी पहाटे महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे यांचे हस्ते महाआरती केल्यानंतर पालखी सोहळा व सायकल वारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली
शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रेचा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले . या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे .
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराज या धर्माचे कळस झाले . संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला व भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. मुगल सम्राट फिरोजशा तुघलक यांनी श्री क्षेत्र घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले .
श्री विठ्ठल भक्तीचा व शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण अशी भव्य रथ व सायकल यात्रा २०२२ पासून सुरु करण्यात आली आहे . यामध्ये ५० वारकरी तर १०० सायकल यात्रींचा सहभाग आहे
पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत
संत नामदेव महाराजांच्या रथ व सायकल यात्रेचे २ डिसेंबर रोजी चंदिगड येथे राजभवन मध्ये पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे स्वागत करणार आहेत. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा व सायकल यात्रींचा सन्मान करण्यात येणार आहे .