जेनेबिया इंग्लिश मीडियम स्कुल कटफळ चे यशस्वी विद्यार्थी
फलटण टुडे (कटफळ ता:बारामती)::-
येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूल कटफळच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळविले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व तालुकास्तरीय क्रीडा अधिकारी कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल बारामती येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. यांमध्ये मुला व मुलींनी 14 व 17 वर्षे वयोगटांमध्ये विविध वजन गटात विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यांमध्ये प्रथम क्रमांक- रांजन खराडे, मोहसीन तांबोळी, सार्थक चव्हाण ,कुलसुम खान, प्रियल ढाणे तर द्वितीय क्रमांक- उमर खान, आयुष सागवेकर, सायली मासनवार, आर्या रेडकर, इकरा सय्यद, अर्पिता जव्हारे तसेच पियूष मोकाशी, आराध्या रेडकर, अनुष्का गिरमे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यशस्वी खेळाडूंचे, पालक, मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते, मनोज मदने, अंकिता धुमाळ मॅडम यांना शाळेच्या प्राचार्यां. इन्सिया नासिकवाला यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.