टेक्निकल हायस्कूल मध्ये बालदिन साजरा करत असताना विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी)::-
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात देश्याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो.पंडित नेहरू यांना लहान मुले आवडत असे म्हणून हा दिवस बालदिन म्हणून साजरा करतात.यावेळी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य कल्याण देवडे,अर्चना पेटकर, सुदाम गायकवाड,प्रदीप पळसे,महादेव शेलार व काही विद्यार्थांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य श्री कल्याण देवडे होते.आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या पंडित नेहरू यांच्या विषयी इ 7 वी ब मधील कु.संस्कृती दळवे.विवेक घुले, अनन्या भिसे,सोहम काकडे,वैष्णवी कुंभार यांनी आपली मनोगते साजरी केली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य कल्याण देवडे यांनी पंडित नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्ती मध्ये असणारे योगदान स्पष्ट करत स्वातंत्र्य प्राप्ती नंतर त्यांनी देशासाठी दिलेले योगदान सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुंभार व यशोधरा खरात यांनी केले..कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे सौ.मनीषा रूपणवर व प्रदीप जगताप यांनी केले.